बिझनेसच्या दुनियेत रोज काही नवे अपडेट्स येत असतात, अदानी अंबानी तसेच इतर बरेच पुरुष श्रीमंतांच्या यादीत आहेत पण पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत नुकतेच जिंदाल ग्रुप च्या सावित्री जिंदाल यांनी मागे टाकून भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत आल्या आहेत. आज आपण भारतातील अश्याच Top 10 श्रीमंत महिला व त्यांच्या कामाबद्दल जाणून घेणार आहोत.
Forbes च्या अनुसार भारतातील Top १० या महिला कोण आहेत..? : Top 10 Richest Womens of India
१ Savitri Jindal (सावित्री जिंदाल):
सावित्री जिंदाल या दहा महिलांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत JINDAL GROUP च्या सावित्री जिंदाल. सावित्री देवी जिंदाल (जन्म 20 मार्च 1940)या एक भारतीय उद्योगपती आणि राजकारणी आहे. त्या O.P. Jindal Group च्या चेअरपर्सन आहेत. तसेच त्या अग्रोहा येथील महाराजा अग्रसेन वैद्यकीय महाविद्यालयाच्या अध्यक्षाही आहेत. फेब्रुवारी 2024 पर्यंत, जिंदाल कुटुंबाची एकूण संपत्ती $29.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
२ Rohiqa Cyrus Mistry (रोहिका सायरस मिस्त्री) :
रोहिका या दहा महिलांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. रोहिका सायरस मिस्त्री ही दिवंगत सायरस मिस्त्री यांची पत्नी आहेत, सप्टेंबर 2022 मध्ये वयाच्या 54 व्या वर्षी कार अपघातात सायरस मिस्त्री हे मरण पावल्यानंतर रोहिका यांना कौटुंबिक साम्राज्यात तिच्या पतीचा वारसा मिळाला. काही आठवड्यांनंतर त्याच्या वडिलांचे निधन झालेरोहिका मिस्त्रीची एकूण संपत्ती ८.२ अब्ज डॉलर्स आहे जी INR मध्ये 56000 कोटी रुपये आहे, ज्यामुळे ती भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत महिला बनली आहे.
३ Rekha Jhunjhunwala (रेखा झुनझुनवाला):
रेखा झुनझुनवाला या दिवंगत अब्जाधीश स्टॉकहोल्डर व भारताचे “Warren Buffett” राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पत्नी आहेत. रेखा झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती ७.६ अब्ज डॉलर्स इतकी आहे, ती भारतातील तिसरी सर्वात श्रीमंत महिला बनली आहे.
४ Leena Gandhi Tewari (लीना गांधी तिवारी):