Site icon Times11 Marathi

भारतातील Top १० श्रीमंत महिला कोण आहेत..? : Who is India’s Top 10 Richest Womens ?

Spread the love

बिझनेसच्या दुनियेत रोज काही नवे अपडेट्स येत असतात, अदानी अंबानी तसेच इतर बरेच पुरुष श्रीमंतांच्या यादीत आहेत पण पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत नुकतेच जिंदाल ग्रुप च्या सावित्री जिंदाल यांनी मागे टाकून भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत आल्या आहेत. आज आपण  भारतातील अश्याच Top 10 श्रीमंत महिला व त्यांच्या कामाबद्दल जाणून घेणार आहोत.

Forbes च्या अनुसार भारतातील Top १० या महिला  कोण आहेत..? : Top 10 Richest Womens of India

१ Savitri Jindal (सावित्री जिंदाल):

Top10 Richest women : Savitri Jindal (सावित्री जिंदाल)

सावित्री जिंदाल या दहा महिलांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत JINDAL GROUP च्या सावित्री जिंदाल. सावित्री देवी जिंदाल (जन्म 20 मार्च 1940)या एक भारतीय उद्योगपती आणि राजकारणी आहे. त्या O.P. Jindal Group च्या चेअरपर्सन आहेत. तसेच त्या अग्रोहा येथील महाराजा अग्रसेन वैद्यकीय महाविद्यालयाच्या अध्यक्षाही आहेत. फेब्रुवारी 2024 पर्यंत, जिंदाल कुटुंबाची एकूण संपत्ती $29.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

२ Rohiqa Cyrus Mistry (रोहिका सायरस मिस्त्री) :

Top10 Richest women : Rohiqa Cyrus Mistry

रोहिका या दहा महिलांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. रोहिका सायरस मिस्त्री ही दिवंगत सायरस मिस्त्री यांची पत्नी आहेत, सप्टेंबर 2022 मध्ये वयाच्या 54 व्या वर्षी कार अपघातात सायरस मिस्त्री हे मरण पावल्यानंतर रोहिका यांना कौटुंबिक साम्राज्यात तिच्या पतीचा वारसा मिळाला. काही आठवड्यांनंतर त्याच्या वडिलांचे निधन झालेरोहिका मिस्त्रीची एकूण संपत्ती ८.२ अब्ज डॉलर्स आहे जी INR मध्ये 56000 कोटी रुपये आहे, ज्यामुळे ती भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत महिला बनली आहे.

३ Rekha Jhunjhunwala (रेखा झुनझुनवाला):

Top10 Richest women : Rekha Jhunjhunwala (रेखा झुनझुनवाला)

रेखा झुनझुनवाला या दिवंगत अब्जाधीश स्टॉकहोल्डर व भारताचे “Warren Buffett”  राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पत्नी आहेत. रेखा झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती ७.६ अब्ज डॉलर्स इतकी आहे, ती भारतातील तिसरी सर्वात श्रीमंत महिला बनली आहे.

४ Leena Gandhi Tewari (लीना गांधी तिवारी):

Top10 Richest women : Leena Gandhi Tewari (लीना गांधी तिवारी

 

लीना गांधी तिवारी एक भारतीय उद्योगपतीआणि लेखिका आहेत. त्या USV PHARMA PVT.LTD या मुंबईतील बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल आणि बायोटेक्नॉलॉजी कंपनीच्या अध्यक्षा आहेत. USV ची स्थापना तिचे आजोबा विठ्ठल बाळकृष्ण गांधी यांनी 1961 मध्ये केली होती. लीना गांधी तिवारी यांची एकूण संपत्ती 4.8 अब्ज डॉलर्स इतकी असून, ती भारतातील चौथी सर्वात श्रीमंत महिला बनली आहे.

५ Vinod Rai Gupta (विनोद राय गुप्ता):

Top10 Richest women : Vinod Rai Gupta (विनोद राय गुप्ता)

विनोद राय गुप्ता आणि त्यांचा मुलगा अनिल राय गुप्ता हे मुख्यत्वे Havells India मधील त्यांच्या Holding मुळे अब्जाधीश आहेत. फोर्ब्सनुसार, विनोद राय गुप्ता, यांची ४.३ अब्ज डॉलर्स एवढी संपत्ती आहे आणि त्या भारतातील पाचवी सर्वात श्रीमंत महिला आहेत.

६ Falguni Nayar (फाल्गुनी संजय नायर) :

Top10 Richest women : Falguni Nayar (फाल्गुनी संजय नायर)

फाल्गुनी संजय नायर या एक भारतीय अब्जाधीश उद्योगपती आहे, ज्या Beauty and Lifestyle Ritail कंपनी Nykaa च्या संस्थापक आणि CEO आहेत, जी कंपनी FSN ई-कॉमर्स Ventures म्हणून ओळखली जाते जी त्यांच्या स्वतःच्या नावाचे संक्षिप्त रूप आहे. नायर दोन self-made महिला भारतीय अब्जाधीशांपैकी एक आहेत. यांची ३.० अब्ज डॉलर्स एवढी संपत्ती आहे. त्या भारतातील सहाव्या सर्वात श्रीमंत महिला आहेत.

७ Smita Crishna-Godrej (स्मिता व्ही. कृष्णा):

Top10 Richest women : Smita Crishna-Godrej (स्मिता व्ही. कृष्णा)

स्मिता व्ही. कृष्णा या एक भारतीय शेअर व्यापारी आहे ज्या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे.  स्मिता कृष्णा-गोदरेज या Godrej कुळातील आहेत आणि कौटुंबिक मालमत्तेत 20% हिस्सा त्यांच्या मालकीचा आहे. कृष्णा यांची एकूण संपत्ती ३.० अब्ज डॉलर आहे. त्या भारतातील सातव्या  सर्वात श्रीमंत महिला आहेत.

८ Anu Aga (अनु आगा):

Top10 Richest women : Anu Aga (अनु आगा)

अनु आगा एक भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत ज्यांनी 1996 ते 2004 या कालावधीत Thermax या energy and environment engineering व्यवसायाचे नेतृत्व केले होते. त्या आठ सर्वात श्रीमंत भारतीय महिलांमध्ये आहेत. आगा यांची एकूण संपत्ती २.५ अब्ज डॉलर आहे. त्या भारतातील आठव्या   सर्वात श्रीमंत महिला आहेत.

९ Kiran Mazumdar-Shaw (किरण मुझुमदार-शॉ) :

Top10 Richest women : Kiran Mazumdar-Shaw (किरण मुझुमदार-शॉ)

किरण मुझुमदार-शॉ या एक भारतीय अब्जाधीश उद्योजक आहेत. त्या बंगलोर येथील Biocon Limited and Biocon Biologics Limited या biotechnology कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षा आणि संस्थापक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगलोरच्या माजी अध्यक्षा आहेत. किरण यांची एकूण संपत्ती २.३ अब्ज डॉलर आहे. त्या भारतातील नवव्या सर्वात श्रीमंत महिला आहेत.

१० Radha Vembu (राधा वेम्बू):

Top10 Richest women : Radha Vembu (राधा वेम्बू)

राधा वेम्बू या  एक भारतीय अब्जाधीश उद्योगपती आहे आणि Zoho Corporation या भारतीय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीमधील बहुसंख्य स्टेकच्या मालक आहेत. राधा वेम्बू यांची एकूण संपत्ती २.१ अब्ज डॉलर आहे. त्या भारतातील दहाव्या सर्वात श्रीमंत महिला आहेत.

हि माहिती कशी वाटली हे आम्हाला comment करून नक्की सांगा व सर्वांसोबत शेअर करा आणि Times११Marathi ला सोशल मिडीयावर follow नक्की करा.


Spread the love
Exit mobile version