Railway Recruitment 2024 : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हि आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत आजपासून म्हणजेच २० जानेवारी पासून या भरतीसाठी अर्ज करू स्विकारले जाणार आहे. १९ फेब्रुवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार असून जवळ-जवळ ६००० पदांसाठी बंपर भरती जाहीर झाली आहे. Railway Recruitment Board (RRB) ने Assistant Loco Piolet (ALP) पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. आजपासून म्हणजेच २० जानेवारी पासून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. १९ फेब्रुवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल.
कोण अर्ज करू शकतो ?
ITI डिप्लोमा केलेला कोणताही विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतो. उमेदवाराचे वय हे कमीत कमी १८ आणि जास्तीत जास्त ३० वर्ष असावे. राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवाराला सवलत देण्यात येईल.
निवडीची Process काय असणार आहे ?
1) दोन प्रकारच्या Computer Based Test -१ (CBT) 2) Computer Based Aptitude Test (CBAT) 3)डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन 4) मेडिकल टेस्ट
या भरतीसाठी फी किती असणार आहे ?
रेल्वेतील या भरतीसाठी (Railway Recruitment 2024) अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क द्यावे लागेल. अर्ज करणाऱ्या SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला आणि तृतीय श्रेणीतील उमेदवारांना फक्त 250 रुपये फी भरावी लागेल.
भरतीचा अर्ज कसा करायचा ?
भारतीय रेल्वेतील या भरतीचा अर्ज उमेदवारांनी IndianRailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी