Bomb Threat | दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्बची असल्याची मोठी बातमी समोर आलेली आहे. त्यानंतर या विमानाला तपासणीसाठी आयसोलेशन बेमध्ये देखील पाठवण्यात आलेले होते. विमान सुरक्षा आणि बॉम्ब निकामी करणारे पथक सध्या या ठिकाणी कार्यरत आहे.
सदर विमान पहाटे साडेपाच वाजता दिल्लीहून (Bomb Threat in IndiGo airplane) वाराणसीला जाणार होते. याच वेळी या फ्लाईट मध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सर्व प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत व या विमानाची तपासणी केली जात आहे. या विमानामध्ये बॉम्ब (Bomb Threat) असल्याची माहिती मिळाल्यानंतर इंडिगोच्या क्रूने अलर्ट चालू करुन प्रवाशांना विमानातून उतरण्याची विनंती केली. प्रवाशांना ही माहिती समजताच, सगळे प्रवासी खूप घाबरले आणि काही प्रवासी आपत्कालीन गेटमधून व मिळेल त्या वाटेने बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले, याबाबतचे व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E2211 मध्ये पीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्या नुसार दिली विमानतळावर इंडिगो फ्लाईट 6E2211 यांच्यामध्ये बॉम्ब असा शब्द लिहिलेला टिशू पेपर सापडला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी तपासणी सुरुवात केली. त्यानंतर सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन देखील करण्यात आलेले. आणि विमान सुरक्षा एजन्सीच्या मार्गदर्शक सूचनानुसार विमान दूरच्या खाडीत नेण्यात आले. आणि प्रवाशांना आपत्कालीन मार्गाने बाहेर काढण्यात आले.