Spread the love

HDFC Bank Loan Interest Rate : HDFC बँकेने व्याजदरात वाढ केली आहे, त्यामुळे HDFC बँकेकडून Loan घेणाऱ्या लोकांना चांगलाच फटका बसणार आहे. कारण ज्या लोकांनी या बँकेकडून कर्ज घेतले आहे अशा लोकांचा EMI आणि Intrest Rate Increase केला आहे.

HDFC Bank Loan Interest Rate Increased

किती टक्क्यांनी व्याज वाढणार आहे ?
Interest Rate increase :

HDFC बँकेने कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने MCLR च्या सीमांत खर्चात 0.10 टक्क्याने वाढ केली असून, हे नवे व्याजदर 8 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. बँकेने त्यांच्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. MCLR हा किमान व्याजदर आहे ज्यावर बँका त्यांच्या ग्राहकांना कर्ज देतात. HDFC बँकेचा MCLR 8.90 टक्के ते 9.35 टक्के दरम्यान आहे. आता तो MCLR 8.80 टक्क्यांवरून 8.90 टक्के करण्यात आला आहे. एका महिन्याचा MCLR 8.85 टक्क्यांवरून 8.90 टक्के झाला आहे. तीन महिन्यांचा MCLR 9 टक्क्यांवरून 9.10 टक्के करण्यात आला आहे. सहा महिन्यांचा MCLR 9.30 टक्के करण्यात आला आहे. बहुतांश ग्राहकांना लागू असलेला एक वर्षाचा MCLR ९.२५ टक्क्यांवरून ९.३० टक्के करण्यात आला आहे. 3 वर्षांचा MCLR 9.35 टक्के कायम ठेवण्यात आला आहे.

HDFC MCLR Increased

MCLR वाढल्याचा काय परिणाम होईल ?

कर्जाच्या व्याजात वाढ : MCLR वाढल्यामुळे कर्जाचे व्याजदरही वाढणार आहेत. त्यामुळे कर्ज घेतलेल्या ग्राहकांना Extra Intrest द्यावा लागणार आहे. यामुळे Monthly Installment Increase होणार आहेत.

नवीन कर्ज घेताना अडचणी येतील : क्रेडिट स्कोअर किंवा उत्पन्न कमी असेल अशा लोकांना लोन घेताना अडचणी येतात. वाढलेल्या व्याजदरामुळे ज्यांना नवीन कर्ज घ्यायचे आहे त्यांना कर्ज घेणे कठीण होऊन जाईल.

यामुळे घरगुती खर्चात वाढ होईल व कर्जाची रक्कम वाढेल त्यामुळे लोकांचे घरगुती बजेट कोलमडून जाईल. एकंदरीत काय तर MCLR वाढल्याने बँकांच्या नफ्यात वाढ होते. MCLR वाढल्यामुळे सरकारचा कर महसूल देखील वाढू शकतो. याचा अर्थ सार्वजनिक सेवांवर खर्च करण्यासाठी सरकारकडे अधिक पैसे येतात.

hdfc bank loan interest rates


Spread the love