10 Top Unicorn Startups of India: हल्ली आपल्या देशात व्यवसाय आणि स्टार्टअप्सची एक वेगळी लाट सुरू आहे, बहुतेक लोकांना स्वतःचा नवीन Startup आणि व्यवसाय सुरू करायचा आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आज भारतात स्टार्टअप सुरू करणे खूप सोपे झाले आहे आणि बहुतेक Startups गुंतवणूकदारही आपल्या देशातील व्यवसायांमध्ये आपला पैसा गुंतवत आहेत. यामुळेच आज भारतात १०० हून अधिक Unicorn Startups तयार झाले आहेत.
अशा परिस्थितीत, बरेच लोक आहेत ज्यांना 10 Top Unicorn Startups of India बद्दल जाणून घ्यायचे आहे, म्हणूनच आजच्या लेखात आम्ही तुम्हाला भारतातील टॉप 10 Unicorn Startups बद्दल सांगणार आहोत, जे भारतातील 10 सर्वात मोठे युनिकॉर्न स्टार्टअप आहेत. चला तर मग सुरुवात करूया.
Unicorn Startup म्हणजे काय?
पुढे जाण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला सांगतो की Unicorn Startups ही एक अशी कंपनी होय जिचे वैल्यूएशन 1 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे, आज भारतात 100 पेक्षा जास्त Unicorn Startups तयार झाले आहेत.
तसेच, भारत हा जगातील तिसरा देश आहे ज्यात युनिकॉर्न स्टार्टअपची संख्या सर्वाधिक आहे, सध्या फक्त चीन आणि अमेरिका आपल्या पुढे आहेत. पण येत्या काही वर्षात आपला देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा Unicorn Startup Hub बनेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
10 Top Unicorn Startups of India
खाली आम्ही भारतातील 10 सर्वात मोठ्या Unicorn Startups ची माहिती दिली आहे
Flipkart
तुम्हाला Flipkart कंपनीबद्दल माहितच असेल तसेच हे पण माहित पाहिजे की, हि कंपनी भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे, जिथे तुम्ही जवळपास सर्व काही ऑनलाइन खरेदी करू शकता. याची सुरुवात 2007 मध्ये Binny Bansal आणि Sachin Bansal यांनी बेंगळुरूमध्ये केली होती.
अहवालानुसार, 2023 मध्ये Flipkart कंपनीचे मूल्यांकन 37 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होती, ज्यामुळे ती भारतातील सर्वात मोठ्या युनिकॉर्न कंपन्यांपैकी एक बनली आहे. याशिवाय, आम्ही तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो की वर्ष 2018 मध्ये Flipkart ला Walmart कंपनीने 16 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतले होते.
Dream11
जर तुम्हाला Fantasy Cricket बद्दल माहिती असेल तर तुम्ही Dream 11 बद्दल कधीतरी ऐकले असेलच. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी Sports Fantasy कंपनी आहे जी Bhvait Sheth आणि Harsh Jain यांनी 2008 मध्ये सुरू केली होती.
तुम्हाला सांगायचे झाले तर Dream 11 चे आता लाखो वापरकर्ते आहेत, जे Fantasy Sports खेळण्यासाठी ड्रीम 11 चा वापर करतात. अहवालानुसार, या कंपनीचे मूल्यांकन 2021 मध्ये 8 अब्ज डॉलर्स एवढे होते, ज्यामुळे ती भारतातील सर्वात मोठ्या Unicorn Startups चा एक भाग आहे.
Inmobi
Inmobi कंपनीची भारतात 2007 मध्ये सुरुवात झाली, ही एक बेंगळुरू स्थित मोबाईल जाहिरात कंपनी आहे जी वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांना त्यांच्या जाहिरातींमध्ये मदत करते. Inmobi कंपनीचे Founder & CEO Naveen Tiwari हे आहेत.
याशिवाय, Inmobi कंपनीने 2019 मध्ये Glance नावाची स्वतःची उपकंपनी देखील सुरू केली, जी 2020 मध्येच युनिकॉर्न कंपनी बनली.
Ola Cabs
टॅक्सी आणि राइड्स ऑनलाइन बुक करण्यासाठी तुम्ही कधीतरी Ola Cabs चा वापर नक्कीच केला असेल, Ola ही भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन टॅक्सी राइड बुकिंग कंपन्यांपैकी एक आहे. दररोज लाखो लोक वापरतात, ओला ची सुरुवात 2010 मध्ये Bhavish Aggarwal आणि Ankit Bhati यांनी केली.
याशिवाय Ola कंपनीने परदेशातही आपले कामकाज वाढवले आहे, त्यामुळे भारताबाहेरील अनेक लोक Ola कंपनीचा वापर करतात. अहवालानुसार, 2020 पर्यंत, या कंपनीचे मूल्यांकन 6 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होते आणि म्हणूनच ही कंपनी सर्वात मोठ्या युनिकॉर्न कंपन्यांपैकी एक आहे.
OYO Rooms
OYO Rooms ही भारतातील ऑनलाइन हॉटेल रूम बुकिंगसाठी सर्वाधिक वापरली जाणारी कंपनी आहे, ती Ritesh Agarwal यांनी २०१३ मध्ये सुरू केली होती. तसेच, रितेशने जेव्हा हि कंपनी सुरू केली तेव्हा तो फक्त 21 वर्षांचा होता.
आज OYO ही भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन हॉटेल रूम बुकिंग कंपनी आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवसायात सतत वाढ होत आहे, त्याच्या अहवालांनुसार, 2021 मध्ये या कंपनीचे व्यापार 9 अब्ज डॉलर होते.
Billdesk
Billdesk हि मुंबईतील एक भारतीय Online Payment Gatewayकंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना ऑनलाइन पेमेंटसाठी प्लॅटफॉर्म देते जे merchant website व Banking साठी महत्वाचे काम करते. ही एक स्वतंत्र पेमेंट प्रोसेसिंग कंपनी आहे, जी Payment and Settlement Systems Act, 2007 अंतर्गत नियंत्रित केली जाते आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्या देखरेखीखाली चालते.
Billdesk ची स्थापना भारतीय उद्योजक एम.एन. 2000 मध्ये M.N. Srinivasu, Ajay Kaushal, and Karthik Ganapathy यांनी केली. याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. बिलडेस्क ही भारतातील एक profitable Fintech company पैकी एक आहे .
Zerodha
Zerodha ही एक भारतीय वित्तीय सेवा कंपनी आहे (NSE, BSE, MCX सदस्य) जी ब्रोकरेज-मुक्त इक्विटी गुंतवणूक, किरकोळ, संस्थात्मक ब्रोकिंग, चलने आणि कमोडिटी ट्रेडिंग ची सेवा देते.
त्याची स्थापना 2010 मध्ये Nitin Kamath यांनी केली होती, कंपनीचे मुख्यालय बंगलोर येथे आहे आणि नऊ भारतीय शहरांमध्ये तिचे अस्तित्व आहे. Advanced Trading साठी Zerodha हे NSE च्या सल्लागार समितीचे अधिकृत सदस्य देखील आहेत.
या भारतीय स्टार्टअप्स व्यतिरिक्त, Swiggy, PhonePe, Zomato, Freshworks आणि Nykaa कंपन्या देखील भारतातील 10 टॉप युनिकॉर्न स्टार्टअप्सच्या यादीत समाविष्ट आहेत.
आम्हाला आशा आहे की या लेखातून तुम्हाला भारतातील 10 टॉप युनिकॉर्न स्टार्टअप्सबद्दल माहिती मिळाली असेल, ती तुमच्या मित्रांसह शेअर करा जेणेकरून त्यांना भारतातील 10 टॉप युनिकॉर्न स्टार्टअप्सबद्दल माहिती मिळू शकेल.