Spread the love

PUNE ACCIDENT UPDATE: पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या car अपघातामुळे संपूर्ण पुणे हादरून गेले असून राज्यभरात तसेच देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहेत. प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल या बड्या बापाच्या मुलाने भरधाव वेगाने अलिशान पोर्शे (pune porsche case) गाडी चालवत दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघांना आपला प्राण गमवावा लागला. या प्रकरणाने आता चांगलाच जोर पकडला असून याप्रकरणात आरोपी मुलासह त्याच्या वडील व आजोबांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेनंतर आरोपीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओबाबत एक मोठी माहिती समोर येतेय.

PUNE ACCIDENT Video : मला फेमस व्हायचं होत म्हणून तो व्हिडीओ बनवला…!

त्या घटनेनंतर गुरुवारी २३मे रोजी या अल्पवयीन आरोपीचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता या व्हिडीओमध्ये तो एक रॅप सॉंग गात असल्याचे दिसून आले. व्हिडीओ आल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे झालेल्या घटनेचा थोडासुद्धा पश्चाताप त्याला नसल्याचे अनेकांनी म्हंटले बऱ्याच माध्यमांनी तो व्हिडीओ सर्वत्र दाखवला परंतु, आता तो व्हिडीओ त्या आरोपीचा नसल्याची माहिती समोर आली आहे. ज्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला, त्याने समोर येऊन याबाबत स्पष्टीकरण दिले असून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला त्याचे नाव आर्यन निखर आहे तो दिल्लीतील रहिवाशी असून तो कंटेंट क्रिएटर आहे.

पुण्यातील घटनेतून आपल्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून त्याने घटनेबाबत रप व्हिडीओ तयार केला होता. प्रकरण वाढत असल्याचे पाहून अखेर त्याने याबाबत स्पष्टीकरण दिले. आर्यन ने इन्स्ता स्टोरीवर आणखी एक व्हिडीओ टाकला आहे त्यात त्याने फक्त प्रसिद्धी साठी हा व्हिडीओ केल्याचे सांगितले आहे.

pune news marathi, pune porsche accident

 


Spread the love