Spread the love

Ayodhya Ram Mandir अयोध्या : आयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरात येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी गुरुवारी मंदिराच्या गाभाऱ्यात रामलल्लाची नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. येत्या २२ तारखेला  नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पूर्वीपासून असलेल्या रामलल्लाच्या जुन्या मूर्तीचं पुढे काय करणार ?

मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी मीडियाशी बोलताना सांगितल्यानुसार, मूळगाभाऱ्यात रामलल्लाच्या नवीन मूर्तीसमोर भगवान राम व त्यांच्या भावांच्या मूळ मूर्ती स्थापित केल्या जातील. रामलल्लाची मूळ मूर्ती सध्या दुसऱ्या मंदिरात ठेवण्यात आली असून, येणाऱ्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्यापूर्वी ती नवीन मंदिरातील गाभाऱ्यात श्रीरामांच्या नवीन मूर्तीसमोर ठेवण्यात येणार आहे. रामलल्लाच्या जुन्या मूर्तीची पूजा 1949 पासून केली जात आहे. 20 आणि 21 जानेवारी हे दोन दिवस संपूर्ण मंदिर परिसर सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे.

 

रामलाल्लाची मूर्ती कुणी घडवली ? 

म्हैसूरचे मूर्तीकार अरुण योगीराज यांनी रामलल्लाची 51 इंच उंच मूर्ती घडवलेली आहे. रामलल्लाची मूर्ती घडवणारे ३७ वर्षीय अरुण योगीराज हे कर्नाटक मधील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहेत. अरुण योगीराज हे  कर्नाटक मधील म्हैसूर येथे वास्तव्यास आहेत. २००८ साली अरुण योगीराज यांनी म्हैसूर विद्यापीठातून MBA शिक्षण घेतले. त्यांतर काही काळ एका खाजगी ठिकाणी नोकरी करून त्यांनी मूर्तीकला जोपासण्याचे ठरवले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची दिल्लीतील इंडिया गेट येथे बसवण्यात आलेली ३० फुट उंचीची मूर्ती अरुण योगीराज यांनीच बनवली आहे.


Spread the love