Valentine’s Day Specials : Couples फेब्रुवारी महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान व्हॅलेंटाईन-डे साठीचा उत्साह युवावर्गात आहे. तरुणाई मोठ्या उत्साहात व्हॅलेंटाईन-डे साजरा करतात. भेटवस्तूंबरोबरच रंगीबेरंगी टेडीज आणि इतर भेटवस्तू यानिमिताने बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. बहुतेक सर्वच शहरातील बाजारपेठा व्हॅलेंटाईन-डे च्या साहित्याने सजली आहे.
व्हॅलेंटाइन-डे चे साहित्य मागवण्यात आल्याचे स्थानिक दुकानदारांचे म्हणणे आहे. जेणेकरून लोकांना भेटवस्तू खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाई- डे साजरा केला जात असला तरी त्याची सुरुवात रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि त्यानंतर 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे येतो. त्यामुळे भेटवस्तू देण्याची आणि घेण्याची प्रक्रिया आठवडाभर सुरूच असते.व्हॅलेंटाईन-डे निमित्त दुकानदारांनी सर्व प्रकारच्या भेटवस्तूंचा साठा करून प्रत्येक वस्तू आपल्या दुकानात सजवली आहे. यामध्ये जम्बो टेडी, कपल फोटो फ्रेम, लव्ह टेडी, कॉफी मग, की रिंग, कपल्स फोटो उपलब्ध आहेत. सर्व भेटवस्तू 100 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत उपलब्ध असतात.
खास आकर्षणाचे कस्टमाईझ भेटवस्तू :
अनेकवेळा कपल्स ना कस्टमाईझ गिफ्ट द्यायची इच्चा असते त्याप्रमाणे विविध प्रकारच्या कस्टमाईझ भेटवस्तूही बाजारात पाहायला मिळत आहेत. यासंदर्भात दुकानदारांचे म्हणणे आहे की, कस्टमाइज गिफ्ट्स तरुणांना आकर्षित करत आहेत. कारण लोक त्यांच्या इच्छेनुसार या भेटवस्तूवर नाव आणि फोटो इत्यादी टाकू शकतात. याशिवाय प्रेमीयुगुलांना त्यांच्या जोडीदाराचे फोटो प्रिंट आणि शुभेच्छांचे डिझाईनही मिळू शकतात.
ऑनलाईन कस्टमाईझ भेटवस्तू कुठे मिळतील :
बऱ्याच वेळा स्थानिक बाजारपेठेत या युगुलांना आवडती भेटवस्तू मिळत नसल्याने ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आवडते गिफ्ट जोडीदाराला दिले जाते. अमेझोन, फ्लीफकार्ट, मेषो, अश्या ऑनलाईन platform च्या माध्यमातून गिफ्ट खरेदी केली जातात. Ferns n Petals, Oye Happy, The Signature Box अश्या वेबसाईटच्या माध्यमातून कस्टमाईझ भेटवस्तू तयार करून आपल्या जोडीदाराला आवडती वस्तू उपलब्ध करून दिली जाते.