Site icon Times11 Marathi

SIP का PPF ? चांगला आणि सुरक्षित पर्याय कुठला ? : जास्त रिटर्न्स कश्यात मिळतील ? PPF vs SIP

Spread the love

SIP का PPF? चांगला आणि सुरक्षित पर्याय कुठला ? : जास्त रिटर्न्स कश्यात मिळतील ? PPF vs SIP

आपल्याकडे पैसा वाढवा यासाठीआपण सतत प्रयत्नशील असतो त्यामुळे, आपण वेगवेगळ्या मार्गाने गुंतवणूककरत असतो, कुणी शेअर बाजारात पैसे गुंतवते तर कोणी PPF आणि SIP च्या मदतीने Mutual Fund मध्ये  पैसे गुंतवतात. Share Market च्या तुलनेत PPF आणि SIP हा जास्त  सुरक्षित पर्याय समजला जातो. परंतु PPF आणि SIP या दोन पर्यायांपैकी गुंतवणुकीसाठी कुठला योग्य पर्याय आहे ? किंवा या दोन्हीपैकी जास्त सुरक्षित गुंतवणूक कशात करावी ? असे प्रश्न अनेकवेळा विचारले जातात त्यामुळेच या दोन्हींपैकी नेमका कुठला पर्याय सगळ्यात चांगला व सुरक्षित आहे, हे आज समजून घेऊयात…

SIP आणि PPF मध्ये किती रिस्क आणि रिटर्न्स आहेत? | Risk & Returns of SIP & PPF

कोणतीही गुंतवणूक करत असताना आपल्याला काय फायदा मिळतो व त्यात किती risk आहे हे कायम लक्षात घेतले जाते तसेच, इथे पण गुंतणूक करताना गुंतवणुकीवरील Risk आणि गुंतवणुकीतून मिळणारे Returns याचा दोन्ही गोष्टींचा विचार प्रामुख्याने केला पाहिजे. आजच्या घडीला SIP (Mutual Fund) हा एक असा पर्याय आहे, ज्याच्या माध्यमातून आजमितीला सगळ्यात चांगले returns मिळतात. मात्र हि केलेली गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असून risk जास्त असते. तर PPF हा पर्याय तुलनेने कमी जोखमीचा असून यात कमी risk असते  तसेच ही गुंतवणूक जोखमीच्या अधीन नसते. पीपीएफमध्ये तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर आधीच ठरवून दिलेले Fix Returns दिले जातात.

किती वर्षासाठी गुंतवणूक करावी लागेल ? | Investment Period

SIP मध्ये काळ आणि वेळेनुसार तुमच्या सोईनुसार कधीही बदल करता येतो. तुमच्याकडे कितीपण पैसे शिल्लक राहत असतील तर तुम्ही त्यानुसार SIP करू शकता. गरजेनुसार SIP च्या रकमेत बदलही करता येतो. तर PPF मध्ये तुम्हाला कमीत कमी 15 वर्षासाठी Investment  करावी लागते. योग्य पद्धतीने गुंतवणूक केल्यावर तुम्हाला PPF मध्येही सुद्धा चांगले returns मिळतात .

 

पैसे कसे काढता येतील ? | How to withdraw money from SIP or PPF ?

SIP मध्ये गुंतवलेले पैसे आप्तकालीन स्थिती मध्ये कधीसुद्धा काढता येतात. अगदी तुम्ही निश्चित केलेल्या कालावधीच्या आधीसुद्धा हे पैसे काढता येतात. पण PPF च्या बाबतीत तसे नाही करता येत, ठरवलेल्या मुदतीच्या अगोदर तुम्हाला PPF च्या खात्यातून रक्कम काढता येत नाहीत.

एसआयपीतून जास्त फायदा कसा होईल ? | Benefits of SIP

PPF आणि SIP या Investment च्या दोन्ही पर्यायांचे आपापले फायदे आहेत. ज्यांना कोणतीही risk न घेता risk free investment करायची असेल तर त्यांच्यासाठी PPF हा सर्वोत्तम पर्याय आहे.

ज्यांची थोडीफार risk घ्यायची तयारी आहे, अश्या लोकांनी SIP च्या माध्यमातून पैशांची गुंतवणूक करू शकतात. तुम्हाला Mutual Funds मधून चांगले रिटर्न्स हवे असतील तर SIP करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच ही SIP दरवर्षी वाढवायला पाहिजे, असेही तज्ञांकडून सांगितले जाते. SIP मध्ये दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढ केल्यास तुम्हाला भविष्यात चांगले returns मिळू शकतात. SIP मदतीने भविष्यात वाढणारी महागाई, दरवाढ आदी आव्हानांना तोंड देता येते. म्हणून बरेच लोक चांगली Welth तयार करण्यासाठी SIP करताना दिसून येतात.

 


Spread the love
Exit mobile version