Site icon Times11 Marathi

Crime News : प्रेयसीची हत्या (Murder) करुन त्यानेही आत्महत्या (Suicide) केली, १ महिन्याने उकलले दोन मृत्यूचे गूढ..!

Spread the love

New Mumbai : 16 जानेवारी रोजी नवी मुंबई मधील खारघर हिल येथील परिसरातल्या झाडीमधून एका तरुणीचा सडलेला मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. हा मृतदेह 12 डिसेंबरला कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या वैष्णवी या युवतीचा असल्याचं तपासातून स्पष्ट झालं आहे. त्या दिवशी ती आपला प्रियकर वैभव याच्यासह बेपत्ता झाली होती. दरम्यान, तिचा प्रियकर वैभव याचा मृतदेह 12 डिसेंबरलाच जुईनगर रेल्वे ट्रॅकवर मिळाला होता. आता त्याच्या प्रेयसीचा मृतदेहही मिळाल्याने या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे.

आपल्या प्रेयसीची हत्या करून प्रियकराने स्वतः आत्महत्या केली होती, असं नवी मुंबईच्या गुन्हे शाखेचे DSPअमित काळे यांनी सांगितलं. वैष्णवी बाबर ही 19 वर्षांची तरुणी सायनमध्ये शिकत होती. 12 डिसेंबर 2023 रोजी ती नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता कॉलेजला गेली पण ती परत आलीच नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला; मात्र तरीही ती सापडली नाही. त्यानंतर त्या तरुणीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याच दिवशी वैष्णवीचा प्रियकर वैभव बुरुंगले याचा मृतदेह जुईनगर रेल्वे स्टेशनजवळ सापडला होता. त्या संदर्भात वाशी रेल्वे पोलिसांनी नोंद घेतली होती. मात्र कळंबोली पोलीस आणि वैष्णवीच्या नातेवाईकांनी बरेच प्रयत्न करूनही तिचा शोध लागत नव्हता. 

पुढे या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आला. त्या पथकाने वैष्णवी आणि वैभव यांच्या Mobile Location आणि इतर बाबी आणि CCTV फुटेजेसच्या साह्याने शोध सुरू केला. ती दोघं 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत खारघर हिल्स या परिसरात एकत्र असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसलं.

त्यानंतर वन विभाग, सिडको आणि पोलिसांच्या टीमने सलग 10 दिवस त्या भागात शोधकार्य राबवलं. तेव्हा तरुणीचा सडलेल्या अवस्थेतला मृतदेह सापडला. आत्महत्या करणाऱ्या तिच्या प्रियकराच्या मोबाइलमध्ये पोलिसांना सुसाइड नोटही सापडली. यावरून पोलिसांच्या लक्षात आले कि वैष्णवीची Murder करून वैभव ने Suicide केली.


Spread the love
Exit mobile version