Spread the love

BYD Luxury Electric Sedan Car Seal launched in India: फीचर्स आणि किंमत जाणून घ्या ?

BYD च्या Luxury Electric Sedan Car Seal ची डिलिव्हरी सुरु झाली: Features & Price जाणून घ्या
BYD च्या Luxury Electric Sedan Car Seal ची डिलिव्हरी सुरु झाली: Features & Price जाणून घ्या

चीनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणारी BYD India हि कंपनी भारतीय बाजारपेठेत लक्झरी वाहनांची विक्री करते. या कंपनीने अलीकडेच इलेक्ट्रिक सेडान कारची डिलिव्हरी सुरू केली आहे. या कारमध्ये कंपनीने कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले आहेत ?, त्याची किंमत किती ? हे आज सविस्तर जाणून घेऊयात.

BYD ने भारतीय बाजारपेठेत आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक सेडान कार सीलची डिलिव्हरी सुरू केली आहे. पहिल्या दिवशी कंपनीने किती युनिट्सची डिलिव्हरी केली? यामध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले आहेत आणि ते कोणत्या किमतीत खरेदी करता येईल. या बातमीत आम्ही तुम्हाला ही माहिती देत आहोत.

BYD Luxury Sedan car Seal Features
BYD Luxury Sedan car Seal Features

2024 BYD Seal कोणत्या शहरात मिळेल ?

BYD द्वारे सीलला इलेक्ट्रिक सेडान कार म्हणून ऑफर केली जाते. कंपनीने या लक्झरी इलेक्ट्रिक सेडान कारची डिलिव्हरी 26 मे 2024 पासून सुरू केली आहे. ही कार दिल्ली, एनसीआर, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोचीसह भारतातील अनेक शहरांमध्ये ग्राहकांना देण्यात येत असून या शहरातून तुम्ही हि car घेऊ शकता

Launching : मार्च 2024 मध्ये लाँच 

चीनी कंपनी BYD ने 2023 मध्ये झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शित केली होती व मार्च 2024 मध्ये भारतीय बाजारपेठेत हि आपली पहिली इलेक्ट्रिक सेडान कार लाँच केली. लाँच झाल्यापासून कंपनीला या गाडीसाठी एक हजार पेक्षा जास्त बुकिंग मिळाले आहेत.

BYD चे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय गोपालकृष्णन म्हणाले की BYD SEAL चे भारतातील जोरदार स्वागत हे प्रीमियम इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीला अधोरेखित करते जे कार्यक्षमता, टिकाव, रेंज आणि किंमत संमिश्र रूप आहे.

BYD Seal Sedan car price in India: BYD Seal ची किंमत किती?

BYD कंपनीच्या Seal या इलेक्ट्रिक सेडान कारची एक्स-शोरूम किंमत (Ex Showroom Price) 41 लाख रुपयांपासून सुरू होते. याचे डायनॅमिक व्हेरिएंट या किमतीत सादर केले आहे. याशिवाय, त्याच्या प्रीमियम व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 45.55 लाख रुपये आणि परफॉर्मन्स व्हेरिएटची एक्स-शोरूम किंमत 53 लाख रुपये इतकी आहे.

BYD Seal car Features : कायआहेत फीचर्स ?

भारतीय बाजारपेठेत BYD द्वारे आणलेल्या Seal Luxury परफॉर्मन्स इलेक्ट्रिक सेडान कारमध्ये अनेक चांगली फीचर्स आहेत. यात लेव्हल-2 ADAS, NFC कार्ड इंटिग्रेशन, नऊ एअरबॅग्ज, 10.25-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, गरम आणि वेंटिलेटिड फ्रंट सीट्स, 15.6-इंच टचस्क्रीन, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, ड्रायव्हर सीट मेमरी फंक्शन यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

Super Powerful Battery & Motor : सुपर पॉवरफूल बॅटरी आणि मोटर

बीवायडी सीलमध्ये सेल टू बॉडी तंत्रज्ञान वापरते. यामध्ये सिंगल आणि ड्युअल मोटरचा पर्याय देण्यात आला आहे. त्याचे डायनॅमिक व्हेरियंट 201 bhp आणि 310 न्यूटन मीटर टॉर्कसह आणले आहे. तर त्याच्या प्रीमियम व्हेरियंटमध्ये असलेली मोटर याला 308 bhp आणि 360 न्यूटन मीटर एवढा टॉर्क देते. त्यात बसवलेल्या मोटारमुळे कार केवळ 3.8 सेकंदात 0-100 किलोमीटर प्रतितास वेगाने चालवता येते. याशिवाय यामध्ये बसवलेल्या बॅटरीला एकदा चार्ज केल्यानंतर 650 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते.

अधिक माहितीसाठी https://bydautoindia.com ला भेट द्या


Spread the love