100% Electric Car Loan offer : पेट्रोल- डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्यांना पसंती देत आहेत. गेल्या वर्षभरापासून भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची डिमांड चांगलीच वाढली आहे. सरकार सुद्धा इलेक्ट्रिक गाडयांना प्रोत्साहन असल्याने मार्केट मध्ये अनेक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या आपल्या नवनवीन गाड्या इलेक्ट्रिक स्वरूपात लाँच करत आहेत. मात्र इलेक्ट्रिक वाहनांची किंमत जास्त असल्याने अनेक ग्राहक इच्छा असूनही खरेदी करू शकत नाही.
आता या समस्येवर देशातील no 1 बँक असलेल्या SBI ने एक चांगला मार्ग काढला आहे. तो म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आता इलेक्ट्रिक कार खरेदीवर १००% कर्ज देत आहे. त्यामुळे तुम्ही खिशात पैसे नसताना देखील तुम्हाला हवी ती इलेक्ट्रिक कार लगेचच खरेदी करू शकता.
या कर्जाचा व्याजदर किती आहे – 100% Electric Car Loan Intrest Rate
ग्राहकांना त्यांना आवडेल ती इलेक्ट्रिक कार खरेदी करता यावी यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी Special Offer सुरू केली आहे. यामध्ये आपण कारच्या ऑन-रोड किमतीच्या 90% पर्यंत कर्ज घेऊ शकता. तर काही खास मॉडेल्सवर 100% कर्ज सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. SBI सामान्य वाहन कर्जाच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार कर्जावरील व्याजावर 0.25 टक्के सूट आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सध्या सामान्य कारवर 8.85 ते 9.80 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. तर इलेक्ट्रिक कारवरील कर्जाचा हा व्याजदर 8.75 ते 9.45 टक्के इतका आहे.
कुणाला हे कर्ज मिळू शकते : SBI 100% Electric Car Loan Eligibility
या इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी 21 ते 70 वर्षे वयोगटातील कोणताही ग्राहक कर्ज घ्यायला अर्ज करू शकतो. हे कर्ज तुम्हाला ३ ते ८ वर्षाच्या कालावधीसाठी मिळेल.
कागदपत्रे काय लागतील : SBI 100% Electric Car Documents
जर तुम्ही पगारदार कर्मचारी असाल म्हणजेच कोणत्या तरी ठिकाणी नोकरी करत असाल आणि इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी कर्ज (EV Car Loan) घेणार असाल तर तुमच्याकडे मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट असावे. याशिवाय तुमच्या ओळखीचा पुरावा, तुमचा पत्ता, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो इत्यादी कागदपत्रे बँकेकडे जमा करावी लागतील. जर तुम्ही शेती करत असाल तर तरी सुद्धा तुम्हाला हीच कागदपत्रे बँकेकडे द्यावे लागतील. त्यानंतर काही दिवसात बँकेकडून तुमचे कर्ज मंजूर करण्यात येईल.