Site icon Times11 Marathi

जरांगे पाटील यांना आमदार करा : मुख्यमंत्र्यांकडे पत्र

Spread the love

आजचा दिवस म्हणजेच 27 जानेवारी 2024 हा दिवस मराठा बांधवांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. कारण, Manoj Jarange Patil यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला कित्येक वर्षानंतर यश आले आहे. राज्य सरकारने जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या करत मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजामध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. महत्वाचे म्हणजे, जरांगे पाटलांच्या लढ्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे ‘जरांगे पाटलांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात यावी’ अशी मागणी Uday Nare यांनी मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. जरांगे पाटलांच्या रूपात मराठा समाजाला त्यांचे प्रश्न मांडणारा एक रोखठोक नेता मिळाला आहे.
जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकांवर ठाम राहत राज्य सरकारला सर्व मागण्या मान्य करण्यास भाग पाडले. त्यामुळे आज संपुर्ण मराठा समाज जरांगे पाटलांच्या विजयाच्या घोषणा देत आहे.

या पत्रात नक्की काय आहे.?
आजचा हा दिवस मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदला जाईल. गेली अनेक वर्षे मराठा आंदोलनकर्ते आपल्या न्याय्य मागणीसाठी झटत होते. महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून खऱ्या अर्थाने आपण मराठा समाजाला आरक्षण दिले याबद्दल कोटी – कोटी मराठा समाजाच्यावतीने आपले हार्दिक अभिनंदन!


27 जानेवारी 2024 हा दिवस मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदला जाईल. गेली अनेक वर्षे मराठा आंदोलनकर्ते आपल्या न्याय्य मागणीसाठी झटत होते. महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून खऱ्या अर्थाने आपण मराठा समाजाला आरक्षण दिले याबद्दल कोटी – कोटी मराठा समाजाच्यावतीने आपले हार्दिक अभिनंदन! मुख्यमंत्री म्हणून आपण मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळवून देणार असं म्हटले होते . कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार आहोत. त्यावर युद्धपातळीवर काम सुरू आहे. सगळ्या गोष्टी मी इथं सांगत नाही. परंतु, मराठा समाजाने विश्वास ठेवावा की आपलं जे आरक्षण काही मागच्या सरकारच्या चुकांमुळे गेलेलं आहे. ते कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मराठा समाजाला देणार ! असा विश्वास तुम्ही शपथेवर दिला होता व आज शनिवार दिनांक 27 जानेवारी 24 नवी मुंबईतील वाशी येथील मराठा आंदोलनकर्ते ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत होते त्या ठिकाणी स्वतः आपल्या मंत्री मंडळातील सहकाऱ्यांसह उपस्थीत राहिले व इतिहास घडविला व तसा अध्यादेश सुपुर्द केला.या ऐतिहासिक घटनेची नोंद महाराष्ट्रातील केवळ मराठाच नाहीतर सर्व समाजाची जनता घेईल असा मला विश्वास वाटतो.


Spread the love
Exit mobile version